पाथरी तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेच्या नवीन कार्यकारीणीची बिनविरोध निवड; अध्यक्षपदी यशवंत सोडगीर तर सचिवपदी श्रीनिवास तायनाक

पाथरी (विशेष प्रतिनिधी):तलाठी संघटना व मंडळ अधिकारी संघटना, परभणी अंतर्गत तालुका पाथरी येथील नवीन कार्यकारीणी निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आज दिनांक ७ ऑगस्ट (शुक्रवार) रोजी पाथरी येथे झालेल्या या बैठकीत पाथरी तालुका तलाठी संघटनेच्या नूतन कार्यकारीणीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी श्री. यशवंत नारायण सोडगीर तर सचिवपदी श्री. श्रीनिवास दशरथ तायनाक यांची बिनविरोध निवड झाली आहे.

माजी अध्यक्ष श्री. आर. के. कोल्हे यांची प्रशासकीय बदली झाल्याने पाथरी तालुका अध्यक्षपद रिक्त झाले होते. त्या पार्श्वभूमीवर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. आर. के. कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा कार्यकारीणी महिला प्रतिनिधी व्ही. व्ही. बिदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.

जिल्हा कार्याध्यक्ष श्री. आर. के. कोल्हे, मंडळ अधिकारी व्ही. व्ही. बिदे मॅडम आणि ज्येष्ठ सदस्य श्री. सिद्धार्थ बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांच्या उपस्थितीत व गणपूर्तीमध्ये खालीलप्रमाणे नवीन पदाधिकारी घोषित करण्यात आले:

अध्यक्ष: श्री. यशवंत नारायण सोडगीर

सचिव: श्री. श्रीनिवास दशरथ तायनाक

उपाध्यक्ष: श्री. विजय जनार्धन भदर्गे व श्री. गजानन सखाराम धाटगे

कार्याध्यक्ष: श्री. राजू गोरक्ष नरोटे व श्री. रमेश मधुकर तोंडे

सहसचिव: श्री. मोहम्मद अदनान कादिर अंसारी

सल्लागार: व्ही. व्ही. बिदे, श्री. सिद्धार्थ पांडुरंग बागुल, श्री. मिलिंद वसंत कुलकर्णी

संघटक: श्री. मांगुलाल तेजू चव्हाण

कोषाध्यक्ष-सय्यद साजेद

महिला प्रतिनिधी: पूजा माने व अस्मिता जाधव


सदरील बैठकीस महसूल विभागातील सर्व कर्मचारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!