युवा संपर्क दौरा पाथरी विधानसभा मतदारसंघात उत्साहात संपन्न

पाथरी (प्रतिनिधी) – दिनांक ४ मे २०२६ रोजी पाथरी विधानसभा मतदारसंघात युवासेनेच्या वतीने आयोजित युवा संपर्क दौरा उत्साहात पार पडला. या दौऱ्याला युवासेनेचे सचिव तसेच परभणी लोकसभा संपर्क प्रमुख निलेशजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या दौऱ्यादरम्यान पाथरी मतदारसंघात युवासेनेची सदस्य नोंदणी मोहीम राबविण्यात आली. तसेच ‘SIR विशेष सखोल पूर्णनिरीक्षण अभियान’ याबाबतही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विविध ठिकाणी भेटी देत युवकांशी संवाद साधून संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना निलेशजी शिंदे म्हणाले की, येणाऱ्या २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत पाथरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी युवासेनेने आत्तापासूनच जोमाने काम केले पाहिजे. युवकांनी संघटनेशी जोडले जाऊन पक्षाची ताकद वाढवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमास युवासेना जिल्हाप्रमुख अमोल भालेपाटील, आप्पाराव वावरे तसेच पाथरी मतदारसंघातील युवासेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून संघटन अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!