​’नेक्स्ट-जनरेशन करिअर्स २०३५’ पुस्तकाचे सोमठाणा येथे दिमाखात प्रकाशन; भविष्यकाळातील संधींचा

सोमठाणा (प्रतिनिधी): आजच्या धावपळीच्या युगात तरुणांना भविष्यातील करिअरच्या योग्य वाटा दाखवणारे ‘नेक्स्ट-जनरेशन करिअर्स २०३५’ (Next-Gen Careers 2035) या विशेष पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवार, २९ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ८:०० वाजता सोमठाणा (ता. माजलगाव) येथे आयोजित करण्यात आला आहे.

प्रज्ञावंत विचारमंच सोमठाणा यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सुदर्शन भालेराव आणि डॉ. विकास वाघमारे लिखित हे पुस्तक आजच्या तरुणांना भविष्यातील, विशेषतः २०३५ सालापर्यंत बदलणाऱ्या करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन करणार आहे. ‘उद्याच्या करिअरकडे आजच्या तरुणांना नेणारे पुस्तक’ असे या कलाकृतीचे वर्णन करण्यात आले आहे.प्रमुख उपस्थितीया सोहळ्यासाठी प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत:उद्घाटक: मा. श्री. गौरव इंगोले सर (उपविभागीय दंडाधिकारी, माजलगाव).अध्यक्ष: मा. श्री. सदाशिव भालेराव (अध्यक्ष, सद्धाम सेवा संघ, माजलगाव).प्रमुख पाहुणे: मा. श्री. राहुल सुर्यताळ (पोलीस निरीक्षक, माजलगाव विभाग).विशेष निमंत्रित: सोमठाणा येथील समस्त ग्रामस्थ.कार्यक्रमाची वैशिष्ट्येया सोहळ्यामध्ये केवळ पुस्तकाचे प्रकाशनच नाही, तर उपस्थितांसाठी विविध अभ्यासपूर्ण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये प्रामुख्याने:१. पुस्तकाचा परिचय आणि पार्श्वभूमी.२. तज्ज्ञांची प्रेरणादायी भाषणे.३. भविष्यकाळातील करिअरबाबतचा दृष्टिकोन.४. तरुणांशी संवाद आणि थेट मार्गदर्शन.”तुमची उपस्थिती पिढ्यांना प्रेरणा देईल,” असे आवाहन करत प्रज्ञावंत विचारमंच सोमठाणा आणि स्किल्स सिंक सोल्युशन यांच्या वतीने जास्तीत जास्त नागरिकांनी आणि तरुणांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.कार्यक्रमाची थोडक्यात माहिती:स्थळ: सोमठाणा, ता. माजलगाव, जि. बीड.वेळ: बुधवार, २९ एप्रिल २०२६, संध्याकाळी ८:०० वाजता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!