सोमठाणा (ता. माजलगाव):राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमठाणा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य आरोग्य शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सार्वजनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने सोमवारी, २७ एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणीया आरोग्य शिबिरासाठी ‘धरती आयुर्वेदिक महाविद्यालय आणि संशोधन केंद्र’ येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपस्थित होते. यामध्ये डॉ. सोनटक्के मॅडम, पल्लवी भालेराव आणि फार्मसिस्ट शेख पल्लवी भालेराव-उजगरे यांनी रुग्णांची सखोल तपासणी करून मोफत सल्ला व औषधोपचार पुरवले. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी हे शिबिर अत्यंत लाभदायक ठरले.प्रमुख उपस्थितीकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. यामध्ये:शेख साहेब (ग्रामसेवक)इस्माईल पठाण, वैजनाथ भालेरावमदन भालेराव, डी. एल. भालेरावमुजाहिद पठाण, सय्यद शब्बीरफारुक पठाण, तौफिक पठाण, राजेश डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून शिबिराचे उद्घाटन केले.युवा कार्यकर्त्यांचे परिश्रमहे शिबिर यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. यामध्ये प्रामुख्याने रवींद्र भालेराव, प्रीतम भालेराव, आदित्य भालेराव, अनिकेत भालेराव आणि सुमित भालेराव यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.”केवळ जयंती साजरी न करता, समाजाच्या आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम राबवून समितीने एक आदर्श घालून दिला आहे,” अशा भावना सोमठाणा येथील ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या.
