जनगणनेसाठी प्रशासनाचे पाथरीकरांना आवाहन; ‘स्वयं जनगणना’ सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन-तहसिलदार सुनिल कावरखे

पाथरी (प्रतिनिधी):देशाच्या उज्वल भविष्यासाठी आणि अचूक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘जनगणना २०२७’ ची प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. या प्रक्रियेत नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवून आपली गणना स्वतः (स्वयं जनगणना) करावी, असे आवाहन पाथरीचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सुनिल कावरखे यांच्या आदेशाने चार्ज अधिकारी नायब तहसीलदार रमेश धोपे यांनी प्रेसनोटद्वारे केले आहे.

जनगणना:

विकासाचा पायाजनगणना ही केवळ लोकांची मोजणी नसून ती देशाच्या विकासाचा पाया आहे. यातून प्राप्त होणाऱ्या सांख्यिकीय माहितीच्या आधारावरच आगामी काळातील शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि पायाभूत सुविधांचे नियोजन केले जाते. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सरकारी योजनांचे लाभ पोहोचवण्यासाठी आणि संसाधनांचे योग्य वाटप होण्यासाठी ही माहिती अत्यंत आवश्यक आहे.

अशी करा ‘स्वयं जनगणना'(Self Enumeration):

नागरिकांना घरबसल्या मोबाईल किंवा संगणकावरून आपली माहिती भरता येणार आहे. त्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी: वेबसाइट: se.census.gov.in या अधिकृत पोर्टलवर भेट द्या. कालावधी: १ मे ते १५ मे २०२६ या दरम्यान ही सुविधा उपलब्ध असेल.लॉगिन:पोर्टलवर मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्राप्त होणारा OTP प्रविष्ट करून लॉगिन करा.

माहिती भरणे:

कुटुंबातील मुख्य व्यक्ती व इतर सदस्यांची माहिती भरा आणि डिजिटल मॅपवर घराचे अचूक स्थान चिन्हांकित करा. SE ID प्राप्त करा: एकूण ३१ प्रश्नांची उत्तरे भरून माहिती सबमिट केल्यानंतर १६ अंकी ‘Self-Enumeration ID’ (SE ID) मिळेल, तो जतन करून ठेवावा. वेळेची होणार बचत

ज्या नागरिकांनी स्वतः

माहिती भरली आहे, त्यांच्या घरी जेव्हा प्रगणक (Enumerator) पडताळणीसाठी येतील, तेव्हा त्यांना फक्त आपला SE ID दाखवावा लागेल. यामुळे नागरिकांचा आणि प्रशासनाचाही वेळ वाचणार आहे.पाथरी तालुक्यातील ग्रामीण भागाचे ‘चार्ज ऑफिसर’ म्हणून तहसीलदार काम पाहत असून, त्यांच्या अधिनिस्त जनगणना कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या मोहिमेची प्रत जिल्हाधिकारी परभणी आणि जिल्हा माहिती अधिकारी यांनाही कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!