महसूल विभागात खळबळ: पाथरीच्या तहसीलदारांना कार्यमुक्त करण्याचे आदेश, परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती. प्रशासकीय फेरबदल: तहसीलदार एस. एस. हांदेस्वर यांची उचलबांगडी? सुनील कावरखेंवर पाथरीची धुरा

पाथरी (प्रतिनिधी):छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाने आज एक महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित करत पाथरीचे तहसीलदार एस. एस. हांदेस्वर यांची बदली केली आहे. त्यांच्या जागी आता सोनपेठचे तहसीलदार सुनील कावरखे यांच्याकडे पाथरी तहसीलदार पदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.

नेमकी बाब काय?

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या २२ एप्रिल २०२६ च्या आदेशानुसार, तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याच अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयाने हांदेस्वर यांना पाथरी येथून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. हा बदल तातडीने लागू करण्यात आला असून, पुढील आदेश येईपर्यंत सुनील कावरखे हे पाथरीचा कारभार पाहणार आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात अहवाल सादर करण्याचे आदेशविभागीय आयुक्त यांच्या मान्यतेने अपर आयुक्त (महसूल) रिता मेत्रेवार यांनी स्वाक्षरी केलेल्या या पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, हांडेस्वर यांनी आपल्या पदाचा कार्यभार तात्काळ सोपवून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू व्हावे. तसेच, या सर्व कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सोनपेठच्या तहसीलदारांकडे दुहेरी जबाबदारी

सोनपेठचे तहसीलदार सुनील कावरखे यांच्याकडे आता स्वतःच्या तालुक्यासह पाथरी तालुक्याचाही अतिरिक्त कार्यभार आल्याने त्यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे. पाथरी येथील प्रशासकीय कामात आता काय बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!