जिंतूरात कार- दुचाकीच्या भिषण धडकेत दोघांचा मृत्यू ; पाच जण जखमी

जिंतूर(प्रतिनिधी) ता 5,जिंतूर ते औंढा नागनाथ रस्त्यावरील भोगाव मानधानी रस्त्यावर कार व दुचाकीच्या भिषण धडकेत दोघांचा मृत्यू व पाच जण गंभीर जख्मी झाल्याची घटना आज रविवार ५ एप्रिल दुपारी एक च्या सुमारास घडली.वसमत येथील दोन जण दुचाकीवरून जिंतूरकडे तर संभाजीनगर येथील कारने पाच जण जिंतूरहून औढ्या कडे जात होते. भोगाव मानधानी मध्य रस्त्यावर दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

त्यात चार सहा जण गंभीर जखमी झाले. सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात,चालक विजय राठोड तर १०८ रुग्णवाहिका चालक महेश कांगणे, डॉ.कृष्णा घुगे घटनास्थळी धावून गेले, दोन्ही वाहनाच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात अपघातग्रस्ताना दाखल करण्यात आले.वैद्यकीय अधिकारी डॉ मोहीनी श्रृंगारे, परिचारिका घातगीने, दराडे,सिमा कांगणे, शेख सलमान, गंगाधर पालवे, आदींच्या पथकाने गंभीर जखमीवर तातडीने उपचार सुरू केले , परंतु उपचारापूर्वीच मयुर शहाणे (वय ३० वर्षे रा.वसमत ) हे मृत्यू पावले होते.

तर गंभीर जखमी रितेश टाक वय ४० वर्षे रा वसमत,यांना परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचाराकरीता रवाना करण्यात आले,परंतु त्यांची प्रकृती खूप गंभीर होती.इतर जखमी मध्ये तबसुम चाँद पाशा शेख वय ३० वर्षे,मुनीराबी शेख खलील वय ६० वर्षे, शेख माजीद कादर वय ५० वर्षे, शेख सलमान माजीद, शेख शाहीदा माजीद,वय ४० वर्षे सर्व रा.संभाजीनगर यांना पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.घटनस्थळी सपोनि विजय जाधव,परभणी गोपीनीय शाखेचे हवालदार जिया खान पठाण,महामार्ग पोलीस जमादार नेतम,पो.का.नरवाडे,पो का केदारी यांनी मदत करत वाहतूक सुरळीत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!