गोवंश तस्करीविरुद्ध पोलीस अधीक्षक स्वत: उतरले रस्त्यावर -दोन दिवसात पाच गुन्ह्यांत १७ आरोपींविरुद्ध कारवाई, २५ वंशाची मुक्तता

परभणी(प्रतिनिधी)गोवंश तस्करीविरुद्ध परभणी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी कारवाईसाठी स्वतः रस्त्यावर उतरून अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई केली. मिळालेल्या माहितीवरून पाथरी येथे ३१ मार्च रोजी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी नाकाबंदी करून गोवंश दाटीवाटीने कोंबून वाहतूक करताना दोन वाहमे पकडली. पाथरीचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे व त्यांचे सहकारी या कारवाईत सहभागी होते. दुसऱ्या एका कारवाईत शुक्रवारी(दि. ) परभणी शहराबाहेरील बायपास परिसरात गोवंश तस्करी करणाऱ्या एका वाहनावर पोलिस अधिक्षकांनी कारवाई केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे तसेच ग्रामीण पोलिसांचे पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू उपस्थित होते.

दरम्यान, याचवेळी मिळालेल्या माहितीवरून आणखी एक गोवंश तस्करीचे वाहन पकडण्यात आले. पाथरी येथे करण्यात आलेल्या कारवाईत पाथरी पोलिसांत आरोपी अत्तार इरफान अत्तर उलामिन, अझहर रफीउद्दिन इनामदार दोघे रा.पाथरूड ता. माजलगाव जि. बीड, मोहम्मद शारिफ इस्मिया कुरेशी रा. पाथरी, मुंजाजी गणेशराव पंढरकर रा. गणेशनगर परभणी आणि रहमान कुरेशी वलीमिया कुरेशी रा. वांगीरोड परभणी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी दोन पिकप वाहनातून तब्बल दहा गोवंश अमानुष पद्धतीने वाहतूक करताना आढळून आले. या कारवाईत एकूण ५ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर परभणी येथे करण्यात आलेल्या दुसऱ्या कारवाईत परभणी ग्रामीण पोलिसांत आरोपी साईनाथ सखाराम मोरे रा. मंठा जि. जालना आणि मजहर कुरेशी रा. परभणी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत एकूण ७ गोवंशाची सुटका करण्यात आली असून महिंद्रा सुप्रो मॅक्सी वाहनासह एकूण ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!