मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव इंगळे यांची निवड.

पाथरी:-अखिलभारतीय मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी शिवाजीराव इंगळे तर कार्याध्यक्ष पदी मुरलीधर गोंगे यांची निवड करण्यात आली.या पुर्वीच्या अध्यक्षाने खाजगी कारणाने अध्यक्ष पदाचा राजिनामा दिल्याने शनिवार ४ एप्रिल रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या पाथरी तालुका अध्यक्ष,सचिव निवडी संदर्भात येथील हॉटेल पुजा येथे मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांची बैठक जेष्ठपत्रकार तथा परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष किरण घुंबरे पाटील यांच्या अध्यक्षते खाली बैठक संपन्न झाली.

या बैठकीत एकमताने पाथरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी शिवाजीराव इंगळे यांची निवड करण्यात आली तर कार्याध्यक्ष पदी मुरलीधर गोंगे,सचिव पदी दत्ता उफाडे यांची निवड करण्यात आली. या वेळी नवनिर्वाचित पदाधिका-यांचा या वेळी सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. या बैठकी साठी किरण घुंबरे पाटील, शिवाजीराव इंगळे, धनंजय आडसकर, दत्तराव उफाडे, मुरलीधर गोंगे, विठ्ठल प्रधान, आनंद भदर्गे, जलील शेख, विशाल डोंगरे, बाबा दाढेल, लक्ष्मण उजगरे, सिद्धार्थ भदर्गे या सदस्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!