परभणीत पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका: जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

परभणी: जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे. सध्या जिल्ह्यात इंधन टंचाई असल्याची चर्चा सुरू असली तरी, प्रशासनाने स्पष्ट केले आहे की साठा मुबलक असून घाबरून जाण्याचे कारण नाही.अनधिकृत वापरावर धडक मोहीमजिल्हाधिकाऱ्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या व्यावसायिक किंवा अनधिकृत वापराविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे.

घरगुती वापराच्या गॅसचा हॉटेल किंवा इतर व्यावसायिक कामांसाठी वापर करणाऱ्यांवर प्रशासनाकडून धडक मोहीम राबवण्यात येणार आहे. असे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.जपून वापराचे आवाहनइंधनाचा साठा जरी उपलब्ध असला, तरी नागरिकांनी गॅस आणि इंधनाचा वापर काटकसरीने व जपून करावा, असेही प्रशासनाने सुचवले आहे. “पुरवठा सुरळीत आहे, त्यामुळे विनाकारण साठवणूक करून कृत्रिम टंचाई निर्माण करू नका,” असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!