माजलगाव (प्रतिनिधी):तालुक्यातील मौजे सोमठाणा येथे आज ईद-उल-फित्रनिमित्त सामाजिक सलोख्याचे आणि हिंदू-मुस्लिम-बौद्ध बांधवांच्या अतूट नात्याचे दर्शन पाहायला मिळाले. येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केल्यानंतर, गावातील विविध समाजाच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करत शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन व गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या उपक्रमामुळे गावातील सामाजिक एकोपा अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त होत आहे.या प्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य वैजनाथ भालेराव, माजी ग्रामपंचायत सदस्य मदन भालेराव, सोमेश्वर भालेराव, ग्रा.प.सदस्य मा.डी.एल. भालेराव,मा.सरपंच पांडुरंग गोरे,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भूषण भालेराव,अमोल भालेराव, दगडू भालेराव,सुधाकर भालेराव,मारोती भालेराव यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सोमठाणा येथील या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत असून, सण-उत्सव हे जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन एकत्र साजरे केल्याने समाजातील प्रेम आणि बंधुभाव वाढतो, असा संदेश या निमित्ताने देण्यात आला.
